मुंबई : मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण २२ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते २३ डिसेंबर सकाळी १० वाजे पर्यंत मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जवळपास २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. काही भागात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 घाटकोपर, कुर्ल्यात जवळपास २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यानच्या येवई इथल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या दुरुस्ती कामामुळे ही पाणी कपात करण्यात येत आहे. 


घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील कप्पा-१ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम २२ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कुर्ला आणि घाटकोपरमधील काही भाग वगळता उर्वरित मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.


कुर्ल्यात 'या' ठिकाणी पाणी नाही 


एल विभाग – प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.


मुंबईकरांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.