Mumbai Water Cut News in Marathi : यंदा सूर्य (weather update) आग ओकताना दिसतं आहे. फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा (Maharashtra Weather) बसायला लागल्या आहेत. अंगाची लाही लाही होतं आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा कडक असणार आहे, यात काही शंका नाही. उन्हाळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कायम पाणीसंकटची तलवार लटकलेली असते. पण आता मुंबईकरांनाही (Mumbai News) पाणी संकटाचा त्रास होणार आहे. आजपासून पुढील दोन दिवस मुंबईतील (mumbai water cut news today) काही भागांमध्ये (bmc news) पाणीकपात असणार आहे. (Mumbai Water Cut today 9 march to 11 march 2023 water supply latest marathi news)


पाणी जपून वापरा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये आजपासून पुढील दोन दिवस म्हणजे 11 मार्च 2023 पर्यंत दहा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. ठाण्यातील कोपरी पुलाजवळच महापालिकेकडून नवीन पुलाचं काम सुरु असून या कामामुळं मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई 2 जलवाहिनीतून पाणी गळती होते आहे. त्यामुळे ही पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतलं आहे. 


'या' परिसरात पाणी गायब


पूर्व उपनगरे 


टी विभाग - मुलूंड (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग
एस विभाग - भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग
एन विभाग - विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग
एल विभाग - कुर्ला (पूर्व) विभाग
एम/पूर्व विभाग - संपूर्ण विभाग
एम/पश्चिम विभाग - संपूर्ण विभाग
ए विभाग - बीपीटी आणि नौदल परिसर
बी विभाग - संपूर्ण विभाग
ई विभाग - संपूर्ण विभाग
एफ/दक्षिण विभाग - संपूर्ण विभाग
एफ/उत्तर विभाग - संपूर्ण विभाग



दर शनिवारी पाणीसंकट! 


मुंबईकरांना यंदा उन्हाळ्यात पाणीसंकटाला सामोरे जावं लागणार आहे. कारण दर शनिवारी पाणीकपात करण्यात येणार आहे. ही पाणीकपात 6 मे 2023 च्या प्रत्येक शनिवारी होणार असणार आहे. या पाणीकपातीचा फटका संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरांना पडणार आहे.