मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
बीएमसी (Bmc) पाईपलाइनच्या दुरुस्तीची (Reparing Work) कामं करणार आहे. यामुळे पाणीकपात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai News) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत येत्या मंगळवारी आणि बुधवार म्हणजेच 29 आणि 90 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) बंद असणार आहे. त्यामुळे जपूण पाणी वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईत जलवाहिनीच्या (Pipeline) दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (mumbai water supply has been cut between 29 to 30 novmber due to powai pipeline repair work)
मुंबईत पवई (Powai) जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या पवईच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामं बीएमसी करणार आहे. यामुळे पाणीकपात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे 12 विभागांतील पाणीपुरवठ्या परिणाम होणार आहे. अंधेरी व्यतिरिक्त वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मध्य मुंबईतील दादर, माहीम आणि माटुंगा या भागांसह इतर भागातही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
“पवई उच्चस्तरीय जलाशयातील गळती दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. तसंच वेरावल्ली जलाशयाचा आणखी एक इनलेट पुन्हा जोडला जाईल. या कामाला 29 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी हे काम संपणार आहे. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल", असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितंलय.