Mumbai Water Supply Lakes Level : मुंबईकरांना भातसा, तानसा या तलाव्यातून पाणीसाठी करण्यात येतो. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना भातसा आणि तानसा या तलावाचीही पाणीपातळी हळूहळू खालावत आहे. दुसरीकडे हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळ येणार असून समाधानकारक होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानुसार मुंबईकरांना 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल असं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं. (Mumbai Water Supply Lakes Level Only 20 percent stock water cut in May latest news update in marathi )


दुसरीकडे अप्पर वैतरणमा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज तीन हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातोय. या धरणातील साठा हा 20.28 टक्के उरला आहे. वाढता उन्हामुळे हा साठा मे महिन्यात अजून खालावण्याची शक्यता आहे. अशा स्थिती राखीव साठ्याचा मदतीने मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यांमध्ये तलावातील पाणीसाठा पाहून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. किती टक्के पाणीकपात करावी लागेल हेही तलावाची पाणीसाठा पाहून निर्णय घेतला जाणार आहे.