मुंबई : संपूर्ण जगात क्लायमेट चेंज होत आहे. यासंबधी अनेक बातम्या, रिपोर्ट, माहिती समोर येत असते. सलग वाढत्या प्रदुषणाने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. यामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नुकतेच एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. जर क्लायमेट चेंज असेच होत राहिले तर मुंबईसह आशियातील 50 शहरं समुद्रात बुडतील. यामध्ये भारत, चीन, इंडोनेशिया, बांग्लादेश आणि व्हिएतनामची शहरं सामिल होऊ शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या देशांमध्ये संकट
चीन, भारत, बांग्लादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया कोळसा आधारीत प्लांट बनवण्यावर जगात अग्रेसर आहेत. या देशांची लोकसंख्यादेखील जास्त आहे. यासाठी वैज्ञानिकांना शंका आहे की, ग्लोबल वॉर्मिंगचे सर्वात वाईट परिणाम या देशांवर होऊ शकतात. या देशांच्या ऐवजी ऑस्ट्रेलिया आणि अंटार्कटिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही बेटांवरील देश कायमचे नष्ट होतील.


15 टक्के लोकसंखेवर परिणाम
वातावरण बदलांसदर्भात अभ्यास करणारी वेबसाईट म्हणजेच climatecentral.org ने नुकतेच एका अभ्यास अहवालात खुलासा केला की, हाय टाईड झोनमध्ये येणाऱ्या देशांमधील 15 टक्के लोकांवर समुद्राची पाणीपातळी वाढल्याने परिणाम होणार आहे. याशिवाय पुढील 200 वर्षांपासून ते 2000 वर्षांच्या दरम्यान पृथ्वीचा नकाशा बदलेल. या अभ्यासात हे देखील सांगण्यात आले आहे की, जगभरात साधारण 184 जागा असे आहेत जेथे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिणाम होऊ शकतो. भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहरालाही वातावरण बदलाचा फटका बसू शकतो. 


याआधीदेखील रिसर्च
याआधी इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज(IPCC)ने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2100 पर्यंत भारताचे 12 किनारपट्टीवरील शहरं 3 फुट पाण्यात जातील. या शहरांमध्ये मुंबई, चैन्नई, भावनगर, कोच्ची आणि भावनगर सामिल आहे.