मुंबई : मुंबईकरांना आता वोल्वोच्या एसी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळू शकते. यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेल या इंधनापेक्षा मिथेनॉलवर वाहनं चालवल्यास प्रदूषण कमी होण्यास लक्षणीय प्रमाणात मदत होते. त्यामुळे मिथेनॉल, इथेनॉल आणि बायो इंधनावर चालणा-या वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे. 


त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना वोल्वो कंपनीच्या एसी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली ते मुंबई या महामार्गावरची एक लाईन इलेक्ट्रिक ट्रकसाठी तयार करण्याचा विचार सुरु असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.