Cyber crime: मुंबईमध्ये एका युट्यू चॅनल आणि यूट्यूबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाइल्ड पोर्नोग्राफीसारखा कंटेट YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ( NCPCR ) महाराष्ट्र सायबर सेलला दिली होती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्युबच्या चॅनलवर 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबतचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. नंतर हा व्हिडीओ अश्लील असल्याचं समजलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलमध्ये यूट्यूब आणि एका यूट्यूब चॅनलवर आयपीसीच्या कलम 509, पॉक्सोच्या कलम 15, 19 आणि आयटीच्या कलम 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अजूनपर्यंत कोणाला अटक नाही


एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ( NCPCR) ने 8 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक सायबर सेलला नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. युट्यूबवर लैंगिक शोषणाचे व्हिडिओ अपलोड होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. 


पालघरमधील रहिवासी चालवत होता चॅनल


या प्रकरणात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. या तपासातून हा युट्युब चॅनल महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रहिवासी चालवत असल्याचं समोर आलं. याप्रकरणी अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणं गुन्हा मानला जातो.


व्हिडीओमध्ये एक महिलाही दिसून येतेय


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमध्ये अल्पवयीन मुलांसह दर्शकांची संख्या जास्त आहे. एका व्हिडिओमध्ये एक महिला अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य करताना दिसतेय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.