मुंबई : येत्या 7 दिवसांत मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. येत्या काही दिवसात मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक दोनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालं आहे. हे जलाशय सात मेपासून कार्यान्वित होईल. परिणामी सात मे ते १४ मेपर्यंत एल आणि एन प्रभागातील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असं आवाहन पालिकेने केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ७ तारखेपासून कुर्ला आणि घाटकोपरमधील नागरिकांनी येत्या सात तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून प्यावे असं आवाहनही पालिकेनं केलं आहे.


बातमीचा व्हिडिओ