Weather update: डिसेंबर महिना उजाडला असून राज्यात काही प्रमाणात हवेत गारवा जाणवतोय. मात्र अजून हुडहुडी भरवणारी थंडी पडलेली नाही. कडाक्याची थंडी कधी पडणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दरम्यान हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात कमाल तापमानात घट होऊन गुलाबी थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना थंडीचा आनंद घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजून मुंबईमध्ये कडक्याची थंडी पडलेली नाही. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांमध्ये मुंबई देखील कुडकुडणारी थंडी पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वेटर आणि उबदार कपडे तयार ठेवावेत. 


हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या एल-निनोच्या वर्षात थंडीचा वेगळा पॅटर्न दिसून येतोय. परंतु जर हवामानात बदल झाले तर कडाक्याची थंडी देखील पडू शकते. 


पुण्यात पडली कडाक्याची थंडी


शुक्रवारच्या दिवशी पुणेकरांनी मात्र हुडहुडणाऱ्या थंडीचा आनंद घेतला आहे. पहाटेच्या वेळी शहरात धुकं देखील पहायला मिळालं. हवेतील आर्द्रता 98 टक्के इतकी असल्याने रस्त्यावर गोष्टी काही प्रमाणात दिसेनाशा झाल्या होत्या. 


भारताच्या हवामान शास्त्र विभागानुसार, पुढच्या काही दिवसांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढू शकतो. तर पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये राज्यात कमाल तापमान सामन्यपेक्षा कमी राहण्याचीही शक्यता आहे.