मुंबई : खूशखबर मुंबईकरांसाठी आहे. आजपासून बेस्टचा प्रवास स्वस्त झाला आहे. बेस्टचे किमान भाडे पाच रुपये तर एसी बसचे किमान भाडे सहा रुपये असणार आहे. आज सकाळी शेअर टॅक्सीला प्राधान्य देणाऱ्या मुंबईकरांनी कित्येक दिवसानंतर बसने प्रवास केला. कारण जवळच्या अंतरासाठी पाच रुपये द्यावे लागणार असल्याने. मात्र, टॅक्सीसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत होते. महागाईत होरपळेल्यांना बेस्टने दिलासा दिलाय, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गात ऐकायला मिळत आहे. बेस्टचा आजपासून स्वस्त झालेला प्रवास नक्कीच बेस्टला चांगले दिवस आणेल, अशीही प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून उमटत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून 'बेस्ट'चा प्रवास स्वस्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. बेस्ट बसचे किमान भाडे आता पाच रुपये असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबईत किमान पाच रुपये भाड्यात बेस्ट प्रवास करता येणार आहे. बेस्टसाठी आता किमान प्रवास भाडे पाच रुपये असेल. बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आली. यामुळे प्रवाशांना आता मुंबईमध्ये स्वस्तात प्रवास करता येणार आहे.