Mumbai Air Pollution : दिवसाची सुरुवात करत असताना खिडकीतून बाहेर पाहत असाल तर, तुम्हाला सर्वकाही धुसरच दिसत असेल. थंडीचे दिवस सुरु असल्यामुळं हे धुकंच आहे असा तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. कारण हे धुकं नसून, समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं तयार झालेलं धुरकं आहे. (Mumbai Air quality) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला संपूर्ण मुंबईवर (Mumbai) धुरक्याचीच चादर पाहायला मिळत असून, शहरातील हवेची गुणवत्ता खूप खालावल्याचं लक्षात आलं आहे. मंगळवारी माझगावमध्ये सर्वाधिक वाईट हवामान परिस्थितीची नोंद झाली. त्यामागोमागच कुलाबा (Colaba) आणि मालाड इथल्या हवेची नोंद झाली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषित घटक हवेत जमा होत असल्यामुळं हे घटक जमिनीलगतच्या वातावरणात दीर्घकाळ टिकून राहतात परिणामी हवेची गुणवत्ता खालावते असं निरीक्षणातून समोर आलं आहे. (Mumbais Quality of Air Pollution Worsen detoriating day by day)


का बदलली मुंबईची हवा ? (Mumbai Air quality)


सदर बदलाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणात असणारे धूळ, धूर आणि धुकं यांचं मिश्रण अर्थात धुरकं वाढत जातं. सध्या हवेत तरंगणाऱ्या याच अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण भीतीदायकरित्या वाढताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार


 


मुंबईची ही बदललेली हवा पाहता या शहरात दिल्लीसारखीच परिस्थिती उदभवल्याचं निष्पन्न होत आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) 309 नोंदवण्यात आला. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांच्या आधारे (एनएएक्यूएस) हे हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे सूचक आहेत. हवेमध्ये झालेल्या या बदलांमुळे घशामध्ये खवखव, सर्दी, खोकला अशा अडचणींचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. यातूनच आता पुन्हा एकदा अनेकांनीच मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 


तापमानात झालेले बदल (Climate change )


नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात मोठे बदल झाले. त्यातच समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावला आणि धुरकं वाढलं. 


मंगळवारी नोंदवण्यात आलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक


माझगाव 385
चेंबूर 347
वांद्रे-कुर्ला संकुल      328
मालाड     322
कुलाबा  305
भांडुप   300
अंधेरी   228
बोरिवली      208
वरळी  201
नवी मुंबई          166