प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : कचरा नाल्यात न टाकता कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरवर्षी पावसात मुंबईत तुंबल्याने पालिकेवर त्याचे खापर फोडण्यात येते. या पार्श्वभुमीवर पावसाळ्याआधी पालिकेचे अधिकारी मुंबईतील तुंबणाऱ्या नाल्यांची साफसफाई करुन घेत असतात. प्लास्टिकवर बंदी असली तरी नागरिक आपला कचरा हा नाल्यात टाकत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पावसात मुंबईची पुन्हा तुंबई होऊ नये यासाठी कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई झाल्यानंतरही काही नाले हे कचऱ्याच्या ढिगाऱ्याने भरलेले दिसतात. याला आपणच जबाबदार असतात. कारण अनेकजण कचरा हा कचरा कुंडीत न टाकता तो उघड्या गटारात टाकतात आणि त्यामुळे नाले तुंबतात. यामुळे परिसरात पाणी साचते. यावर मुंबई महानगर पालिका आणि विक्रोळी सेवा संघाच्या वतीने आज घाटकोपर पश्चिम येथिल अमृतनगर छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता आणि वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि जनजागृती ही करण्यात आली होते.



यावेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यायची ?, सुका कचरा आणि ओला कचरा यांचे वर्गीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. नाल्यात कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले.