मुंबई : घाटकोपरमधील सोने व्यापारी राजेश्वर उदाणी यांच्या हत्येप्रकरणी सचिन पवार याला घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी अटक करण्यात आलीये. ४ डिसेंबर रोजी राजेश्वर यांचा मृतदेह पनवेलमध्ये सापडला होता. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. मात्र आज मृतदेहाची ओळख पटली. २८ नोव्हेंबर रोजी राजेश्वर उदाणी घराबाहेर पडले होते ते पुन्हा परतलेच नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहायक आहे. दरम्यान,  प्रकाश मेहता यांनी झी २४ तासशी बोलताना जर सचिन पवार एक टक्का जरी दोषी आढळला तर भाजपात त्याला स्थान नसल्याचं सांगितलं... तर  सचिन पवार हा प्रकाश मेहता ह्यांचा माजी स्वीय सचिव होता त्याने पाच वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे त्यामुळे त्यांचा काही संबंध नसल्याचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले 


अधिक माहिती :- हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर


मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्यानंतर राजेश्वर दुसऱ्याच एका गाडीतून नवी मुंबईच्या दिशेनं जाताना फुटेजमधून समोर आलं होतं. या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याचं उघड झालं होतं. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री 'गोपी बहू' अर्थात देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २० जणांची चौकशी केली होती.