मुंबई : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका ६५ वर्षीय मुस्लीम रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास मालाडमधील कब्रस्तानच्या व्यवस्थापनानं नकार दिला. त्यामुळे या मृतदेहाचं अखेर जवळच्या स्मशानभूमीत दहन करण्यात आलं. मृतदेह दफन करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाड मालवणीमधील एका कोरोनाग्रस्त ६५ वर्षीय वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह जवळच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यासाठी नेण्यात आला. मात्र कब्रस्तानच्या व्यवस्थापनानं मृतदेह दफन करण्यास नकार दिला.


अबु आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कब्रस्तानमधील लोकांनी मंत्री अस्लम शेख यांना फोन लावून त्यांच्याशी बोलण्यास सांगितलं. पण अस्लम शेख यांचा फोन उचलला नाही. अखेर पोलीस आणि महापालिकेचे लोक तिथे पाहोचले. त्यांनी नंतर मृतदेह दुसरीकडे स्मशानभूमीत नेऊन त्याचं दहन केलं.


कब्रस्तान कुणाच्या मालकीचं नसतं. त्यामुळे मृतदेह दफन करण्यास नकार देणाऱ्या कब्रस्तानमधील लोकांवर सरकार आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अबु आझमी यांनी केली.


<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>


मुंबई महापालिकेनं सोमवारी एक आदेश काढून कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करावेत आणि दफन करायचेच असेल तर मुंबईबाहेर योग्य ठिकाणी करावे, असं म्हटलं होतं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्याला आक्षेप घेऊन त्यात बदल करण्यास सांगितलं. त्यानंतर मुंबई महापालिकेनं त्यांच्या आदेशात बदल केले होते.