प्रथमेश तावडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील लोकल (Mumbai Local Train) प्रवासात पत्ते बंदी केल्यानंतर विरंगुळा म्हणून मोबाईलवर ल्युडो गेम प्रवाशांच्या आवडीचा झाला आहे.  Ludo गेमने मुंबईकरांना 'याड' लावलं आहे. हा खेळ लोकल प्रवासातील हक्काचा विरंगुळा होऊन गेला आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या फोनमध्ये हा गेम पाहायला मिळत असून एका वेळी जास्तीत जास्त चौघे जण या गेमचा आनंद घेऊ शकतात. लोकल प्रवासात तर भान हरपून खेळणाऱ्यांची डोकी मोबाइलभोवती रिंगण केलेली दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हाच गेम दोन प्रवाशांमधल्या भांडणास कारण ठरला आहे. लुडो गेम खेळण्यावरून लोकल ट्रेन मध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज सकाळी घडली. धावत्या लोकलमध्ये दोन प्रवासी Ludo खेळण्याच्या वादातून आपापसात भिडले. 


प्रवाशांचा एक ग्रुप Ludo गेम खेळत होते, यावेळी बसण्याच्या जागेवरुन त्या ग्रुपमधील एका तरुणाचा उभ्या असलेल्या प्रवाशाबरोबर वाद झाला आणि याचं पर्यावसन हाणामारीत झालं.


p>


 


भाईंदरहून चर्चगेटसाठी निघालेल्या ट्रेन मध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू होती. दोघे प्रवासी एकमेकांना मारहाण करत होते याच वेळी ट्रेन मधील इतर प्रवाशांनी त्यांच्या मारामारीची दृष्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली आहेत. बोरिवली रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.