मुंबै बँकेच्या व्यवहारांची नाबार्डकडून आजपासून तपासणी
मुंबै बँकेच्या व्यवहारांची नाबार्डकडून तपासणी करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबै बँकेच्या व्यवहारांची नाबार्डकडून तपासणी करण्यात येणार आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
नाबार्डची टीम आजपासून गेल्या २ वर्षातील कारभाराचा लेखाजोखा तपासणार आहे. झी मीडियानं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय.
गेल्या काही दिवसांपासून झी मीडियानं नियमबाह्य कर्जवाटप, सिंचन घोटाळ्यातली आरोपीला दिलेलं कर्ज, अध्यक्षांच्या मेव्हण्यानं केलेला घोटाळा, अधिका-यांच्या भरती प्रक्रियेतले घोळ, अशा अनेक प्रकरणांचा झी २४ तासवर पर्दाफाश करण्यात आला.
त्यामुळे रडारवर आलेल्या मुंबै बँकेच्या व्यवहारांची तपासणी करण्याचा निर्णय नाबार्ड घेतलाय.
ही तपासणी पूर्वनियोजित असल्याचं बँकेचं म्हणणं आहे. पण, दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी तपासणी दोन महिने आधीच होतेय हेही इथे लक्षात घ्यायला हवं.