प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस (Tulij Police Station) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना एका आरोपीने (Accused) त्यांच्याच केबीनमध्ये धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. शशिकांत गुजराथी असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक (Accused Arrested) केली आहे. शशिकांत गुजराथी याच्यावर कौटुंबिक न्यायालयात (Family Court) हजर राहण्यासाठी एक वॉरंट (Warrant) काढण्यात आलं होतं. ते बजावण्यासाठी पोलीस कर्मचारी त्याच्या घरी गेले असताना तेथे त्याने पोलिसांशी वाद घातला. तिथून पोलीस त्याला तुळींज पोलीस ठाण्यात घेऊन आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी सव्वा बाराच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या केबीनमध्ये त्याला हजर करण्यात आले होते. नगरकर त्याला वॉरंट समजावून सांगत असताना त्याने अचानक नगरकर यांच्यावर हल्ला केला. त्याने नगरकर यांच्या गणवेशाची बटने तोडून गणवेषावरील स्टार पट्टी खेचून काढली तसेच त्यांना धक्काबुक्की केली.


यावेळी अन्य पोलीस कर्मचारी मदतीला आले आणि त्यांनी हल्ला करणार्‍या आरोपी गुजराथी याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी गुजराथी याच्यावर कलम 353, 332, 323, 505, 506 कलमान्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.


24 तासात खूनाचा उडगडा
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील उभंड नाद्रे गावाजवळ झालेल्या खुनाच्या घटनेचा (Murder Case) धुळे पोलीस पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला आहे. धुळे शहरात राहणाऱ्या यशवंत बागुल यांचा तीन गोळ्या झाडत अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खनू नेमका कोणी व का केला हे स्पष्ट झालेलं नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं होतं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ तपास सुरु केला. यशवंत बागूल यांचं कोणाशी वैर होतं का याचा शोध सुरु केला असता, त्यांच्या हातात महत्त्वाची माहिती लागली.


 या घटनेनंतर धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने वेगाने तपासचक्र फिरवत संशयित आनंद मोहिते आणि पंकज मोहिते या दोघांना अटक केली असून त्यांनी कट रचून यशवंत बागुल यांचा गोळ्या घालून खून केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. यशवंत बागुल यांच्याकडून वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून रागाच्या भरात संगणमताने हा खून केल्याचं दोघांनी पोलिसांना सांगितलं. या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे