`रेल्वे`चे भोंगळ कारभार : निमंत्रण पत्रिकेत दिवंगत आमदाराचे नाव
रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा ढळढळीत नमुना पुन्हा एकदा जगसमोर आलाय. गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आलाय. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी गोरेगाव स्थानकात होणार आहे. पण यानिमित्तानं छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश सावंत यांचं नाव निमंत्रितांच्या यादीत छापण्यात आलंय.
मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा ढळढळीत नमुना पुन्हा एकदा जगसमोर आलाय. गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आलाय. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी गोरेगाव स्थानकात होणार आहे. पण यानिमित्तानं छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश सावंत यांचं नाव निमंत्रितांच्या यादीत छापण्यात आलंय.
निधनास झाली ३ वर्षे
प्रकाश सावंत यांचं निधन झालं त्याला आता जवळपास तीन वर्ष उलटली आहेत. त्यानंतर त्यांच्या मतदार संघात पोटनिवडणूक होऊन त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचं नाव मात्र या यादीत नाही.
गंभीर चूक
हार्बरच्या विस्तारीकरणाच्या उद्धघाटनाचा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. त्यामुळे कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हाती पुरेसा वेळ होता. तरीही अशी गंभीर चूक झाली आहे.