Nana Patole On Hasan Mushrif ED Raid : भाजप हा घाबरलेला पक्ष आहे. त्यामुळे धाडसत्र सुरु असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. आज कोल्हापुरात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी छापेमारी केली. ( Hasan Mushrif ED Raid ) यावरुन नाना पटोले यांनी हल्लाबोल चढवला. दरम्यान, तपास यंत्रणांची कारवाई, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा मुंबईच्या राजभवनावर धडकणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांना यावेळी काँग्रेसकडून निवेदन देण्यात येईल, असे पटोले यांनी माहिती दिली. (Maharashtra Political News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले


तपास यंत्रणांची कारवाई, महागाई, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपला आता सत्ता जायची भीती वाटते आहे, म्हणून परत एकदा धाडसत्र सुरु केलं आहे. मुश्रीफ यांच्यावरती छापेमारीनंतर चौकशी सुरु आहे. त्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरती हल्लाबोल चढवला आहे. सत्ता जाण्याची भीती वाटते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने ईडीचा वापर सुरु केला आहे.


मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका


दरम्यान, भाजपकडून अनेकवेळा सांगितले जाते कर नाही, त्याला डर कशाला? मात्र, भाजपचेच अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्याकडे आधी बाईक होती आणि आता हेलीपॅड आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, अशा शब्दात त्यांनी ईडी कारवाईचा निषेध व्यक्त केला. सोबतच टिळक परिवाराला काय द्यायचे, याचा आम्ही विचार आधीच केला आहे, असे नाना म्हणाले.


राजकीय सुडापोटी ED, CBI चा गैरवापर - सुप्रिया सुळे


ईडीच्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule On ED Raid ) राजकीय सुडापोटी ED, CBIचा गैरवापर करुन त्रास दिला जात आहे. विरोधी पक्षावर कारवाई पुन्हा पुन्हा कशी काय होते, याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावर ज्यावेळी रेड केली होती. त्यावेळी 100 कोटींचा आकडा हा एक कोटींवर आला होता. इडी आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करुन विक्रमच केला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


लालूप्रसाद यादव मोठ्या संकटात! ईडीच्या छाप्यात मुलींच्या घरात 'या' मौल्यवान वस्तू ?


केवळ राजकीय सुडापोटी विरोधकांवर कारवाई केली जात आहे. राज्यात 95 टक्के विरोधी पक्षातील लोकांवरुन कारवाई झालेली आहे आणि अनेक लोक ज्याच्यावर अगोदर कारवाई झाल्या जे भाजपमध्ये गेले त्यावेळेस त्या कारवाई थांबल्या. या सगळ्यांचा डाटा देखील मी तुम्हाला देऊ शकते. केवळ राजकीय सुडापोटी किंवा बदला घेण्यासाठी ही कारवाई करणे हेच दुर्दैव आहे, असे त्या म्हणाल्या.