नारायण राणेंना मोठा धक्का, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली होती. नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. रत्नागिरी पोलिस ठाण्यात अटकेची कारवाई देखील सुरू झाली आहे.
नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अटक टाळण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नारायण राणेंविरोधात राज्यात विविध ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत. हे तीन गुन्हे रद्द करण्यासाठी राणेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नोटीस न बजावताच कारवाई कशी सुरू केली? असा सवाल याचिकेत विचारण्यात आला होता. याचिकेवर थोड्याच वेळात तातडीच्या सुनावणीची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर तो निकाल आला. नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे.