मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाज आणि धूर नसणारे फटाके असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन दिवाळीतच राणेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या मोक्यावर फटाने न फोडण्याचं आवाहन केलं. धूर नको, प्रदूषण नको असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं. पण, असे फटाके आघाडी सरकार मध्ये मिळतील. बारामतीत आवाज नाही धूर नाही असे फटाके फुटलेही असं म्हणत राणेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.


आघाडीच्या मंत्र्यांना आता एकामागोमाग एक अटक होणार असा खळबळजनक दावा करत त्यांनी अनिल देशमुख प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. 


शिवसेनेला टोला....


शिवसेना नेते संजय राऊत यांचा अग्रलेख वाचला असं म्हणत, पोटनिवडणूकीत  1 जागा लोकसभा अपक्ष उमेदवार जिंकला पण सेनेनी डंका पिटला की सेना जिंकली, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला सुनवलं.


मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना शेतकरी , एसटी कर्मचारी आत्महत्या करतात, राज्यातील आर्थिक अवस्था यावर कधी तरी वक्तव्य करावं, भूमिका मांडाव्यात असं वक्तव्य केलं.


नवाब मलिक यांच्यामार्फत दर दिवशी केले जाणारे नवे खुलासे पाहता राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावरच मलिकांना राष्ट्रवादीने सोडून दिलं आहे. मलिक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हीच परिस्थिती झाली आहे, असं राणे म्हणाले.