वाघाची मांजर कशी झाली? म्यॅव म्यॅव आवाजाने अस्वस्थ का झाले? नारायण राणेंचा टोला
Narayan Rane on Shivsena : `ठाकरे यांनी अडीच वर्षात मराठी माणसासाठी काय केलं. गेल्या काही वर्षात सामान्य शिवसैनिकांना काय मिळालं? आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईलच ना! इतरांना सोडा मुख्यमंत्री साधं शिवसैनिकांनाही भेटत नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
मुंबई : 'ठाकरे यांनी अडीच वर्षात मराठी माणसासाठी काय केलं. गेल्या काही वर्षात सामान्य शिवसैनिकांना काय मिळालं? आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईलच ना! इतरांना सोडा मुख्यमंत्री साधं शिवसैनिकांनाही भेटत नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
कोणाच्या आजारपणावर बोलू नये परंतू दुसरा एखादा व्यक्ती असता तर पदावर राहिला नसता. स्वतःहून राजीनामा दिला असता. या महाराष्ट्रात अशी वेळ कोणावर आली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर, सूड बुद्धीचे राजकारण बंद करा. मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता आणि पात्रता नसतानाही सव्वादोन वर्ष काढली ही बाळासाहेबांची पुण्याई होय. असा घणाघातही राणे यांनी केला.
जुहूच्या बंगल्यावरील कारवाई ही सूडाच्या राजकारणातून आहे. असाच त्रास नितेशलाही झाला. म्यॅव म्यॅव बोलले म्हणून नितेशच्या मागे त्याने न केलेल्या गोष्टींचा ससेमिरा लावला. मुळात वाघ गेले आणि मांजरं कशी आली. स्वतःला वाघ म्हणणारे, मांजरीच्या आवाजाने का अस्वस्थ झाले हे कळले नाही. असा मिश्किल टोलाही राणे यांनी लगावला.