मुंबई : Narayan Rane's reply to Sanjay Raut's criticism : हातात इडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते. तुम्हाला राज्यसभेचा खासदार निवडून आणता येत नाही. भाजपचे 303 पेक्षा जास्त आमदार आहेत. आणि आता ते आम्ही 400 पर्यंत नेणार आहोत. शिवसेनेचे 18 खासदार आहेत पुढे सहा येणार नाहीत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या तीन जागा जिंकणार सांगत होते, काय झाले? राऊतही एका मताने आले. काठावर आले. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी 145 मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या बाजूला व्हा, असे नारायण राणे म्हणाले. 


महाविकास आघाडीतील  तुमचे आठ आमदार फुटतात. तुमची विश्वासहार्यता आहे कुठे? तुमचे आमदार तुम्ही टिकवू शकत नाही आणि बढाया मारता. आमची मते पाहिली तर तुमच्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही अल्पमतात आला आहात, असा राणे यांनी हल्लाबोल केला.



काही लोक तीन जागा जिंकणारच अशा बढाया मारत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत, असे सांगत होते. अत्यंत खालच्या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही बोलत होते. मी त्यांच्या भाषेचा उच्चार करणार नाही. मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलतात ती संसदी भाषा नाही. पण या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांची राज्यात आणि देशात नामुष्की झाली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्देव आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.