मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला अखेरचा 'हात' दाखवला. त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिलाय. त्याचबरोबर माजी खासदार नीलेश राणेंनीही काँग्रेसला रामराम केला. मात्र, आमदार नितेश राणेंनी पक्ष आणि आमदाराकी राजीनामा दिलेला नाही. नितेश राणेंनी आपली आमदारकी वाचविण्यासाठी असे केल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणेंनी काँग्रेसवर टीका केल्यास आमदार नितेश राणेही अडचणीत येऊ शकतात. पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होईल, या भीतीने काँग्रेसचे विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईत राहणे पसंत केले. दोन दिवसांपूर्वी कुडाळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रदेश कार्यकारिणीवर टीका केली होती. मात्र, नारायण राणेंनी पक्ष सोडला तरी नितेश काँग्रेसमध्येच आहेत. दरम्यान, वेळ बघून निर्णय घ्यावा लागतो, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केलेय. राणे हेच माझे बॉस अाहेत, असे सांगत काँग्रेसला इशारा दिलाय.


नारायण राणे यांनी मी आणि नीलेश राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून आमचा काँग्रेसशी संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले. दसऱ्यानंतरच पुढील निर्णय घेणार असे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांचा मला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. त्यामुळे राणे पुढे काय करतात याकडे लक्ष लागलेय.