मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना या वादाने आक्रमक रूप धारण केलं आहे. नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याजवळ भाजप-शिवसेना आमनेसामने भिडले आहेत. जुहूत अतिशय तणावाचं वातावरण आहे. शिवसेनेचे युवासेना प्रमुख वरूण सरदेसाई आक्रमक झाले आहेत. आक्रमक शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांना देखील धक्काबुकी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला शिवसैनिकांना पुढे करून शिवसैनिक राणेंच्या बंगल्यावर चाल करून येतील,अशी शक्यता असल्यानं राणे समर्थकांनी महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केलीय. 




केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतील आक्षेपार्ह विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. यामुळे मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 



शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई आक्रमक... भाजपा कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक केले आहेत. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले आहेत. मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राणे समर्थकांनी महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केलीय. जुहूत तणाव वाढतोय.