मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.' असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.



राज्यातील सत्ता संघर्षाच्या खेळात आता मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणेंच्या टीकेला आता राऊत काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.


 


छगन भुजबळ यांचे सूचक विधान
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 


शिवसेनेची अस्वस्थता त्यांच्या बंडखोर आमदारांनी बोलून दाखवली आहे. याआधी आमच्या कानावर असं काही आलं नव्हतं? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार पडणं, राजिनामा देणं वेगैरे आम्हाला नवीन नाही. राष्ट्रवादी कधीही निवडणुकांसाठी तयार आहे. असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे,