नारायण राणे VS शिवसेना... राणेंच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद
राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे राज्यात शिवसेना आक्रामक
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्यात सर्वत्र शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरणं तापलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे राणेंविरोधात महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता राणेंना अटक होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे राणेंचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
नाशिक घटनेनंतर भाजप कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. खबरदारी बाळगत मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांना घोषणाबाजी करत राणेचा केला निषेध केला आहे. राज्यात परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे.
एवढंच नाही तर नारायण राणे यांच्या विरोधात नगरमध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक आणि शिवसैनिकांच्या उपस्थित तक्रार दाखल करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपा कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक केली.
राणेंच्या बंगल्यावर बंदोबस्त वाढवण्याची मागणी
महिला शिवसैनिकांना पुढे करून शिवसैनिक राणेंच्या बंगल्यावर चाल करून येतील,अशी शक्यता असल्यानं राणे समर्थकांनी महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केलीय. जुहूत तणाव वाढत आहे.