मुंबई : 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम यांचा नवा मराठी सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. सर्वसामान्यांची भूमिका साकारणारा भाऊ कदम यांचा 'नशिबवान' हा सिनेमा ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.  'नशीबवान'चे पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता तर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा ट्रेलर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात भाऊ कदम सफाई कर्मचारी दिसत आहे. गरिब परिस्थिती आणि त्यावर मात करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तो कसा श्रीमंत होतो. त्याचा रुबाब बदलतो. हे सध्या ट्रेलरवरून तरी दिसत आहे. या सिनेमात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असेच डॉयलॉगवरुन दिसत आहे.



भाऊ कदम यांच्या अभिनयाची खास झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हलके फुलके विनोदही यात पाहायला मिळत आहेत. हा सिनेमा अतिशय वास्तववादी वाटतोय. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीने या सिनेमाची मांडणी केली आहे. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या सिनेमात आहेत.