NCP Jayant Patil Reaction:  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. आज करण्यात आलेल्या कृतील शरद पवार यांचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही पाठींबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेच्या सदस्यांनी विरोधी पक्षात न राहता सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


5 जुलैला तालुका, जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील कार्यकरणीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मिटींगला बोलावले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 


सत्तेत असणाऱ्यांनी मेजॉरीटी असताना देखील पुन्हा एकदा विरोधी पक्ष फोडला आहे. शिवसेनेच्या घटनेनंतर न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी निवाडा दिला होता. त्यानंतर अशी घटना घडेल असे वाटले नव्हते. 


शरद पवार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने वेळोवेळी विश्वास दाखविला आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण थांबलं पाहीजे, या विचारसरणीला ज्यांचा पाठींबा आहे, ते सक्षमपणे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहतील असे जयंत पाटील म्हणाले. 


पक्ष सोडून गेलेल्यांवर कारवाई करण्याबाबत आम्ही अद्याप विचार केला नाही, असे ते म्हणाले. 


पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन ज्या 9 सदस्यांनी शपथ घेतली आहे. काही आमदार शरद पवार यांना येऊन भेटत आहे. या सर्वांची नक्की भूमिका काय आहे? हे स्पष्ट व्हायला हवे. 


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याने काम करता येत नव्हते, अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. आता अजित पवार त्यांच्यासोबत आहे, तेव्हा त्यांना परतण्यास वाव आहे, असा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला.