मुंबई : Navaneet Rana : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नोटिशीविरोधातील दावा राणा दाम्पत्यांने (Rana couple) मागे घेतला आहे. (withdrawing the application challenging the notice of the BMC) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खार येथील घरातल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी (unauthorized construction) मुंबई पालिकेने  (Mumbai Municipal Corporation) राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्याविरोधात राणा दाम्पत्यानं दिंडोशी न्यायालयात आव्हान दिलं होते. त्यांच्या अर्जावर काल सुनावणी झाली. यावेळी बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतल्याचे राणा यांनी  न्यायालयाला सांगितले. 


शिवाय पालिकेच्या नोटिशीला आव्हान देणारा अर्ज मागे घेत असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान न्यायालयाने राणा दाम्पत्याची विनंती (Rana couple's request) मान्य करुन त्यांचा अर्ज निकाली काढला आणि एका महिन्याच्या आत बांधकाम नियमित करण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिली आहे.