मुंबई : आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रभरात नवरात्रीचे हे नऊ दिवस उत्साह असतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलीय. मंदिराचा परिसर भक्तमीमय वातावरणानं फुलून गेलाय. 


तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजाभवानी मंदिरातही भाविकांची गर्दी होऊ लागलीय. नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी गडावरही भाविकांचा ओघ सुरू झालाय. तर माहुरला रेणुकामातेच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविक दाखल होऊ लागलेत.