Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर आज दुपारी पहिलं व्यावसायिक विमानाचे आज यशस्वीरित्या लँडिग झालं आहे. इंडिगो A320 विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे. तर, पुढील वर्षात नवी मुंबईकरांना हक्काचं विमानतळ मिळणार आहे.  17 एप्रिल 2025 मध्ये पहिले प्रवाशी आणि कार्गो विमान सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबई विमानतळाचे सीईओ यांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग झाले आहे. आज दुपारी  इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, '17 एप्रिल 2025 मध्ये पहिले प्रवाशी आणि कार्गो विमान सुरू होईल. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसंच, सर्व परवानग्या मार्चपर्यंत मिळतील. 17 एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन  होईल तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलं आहे. 1,160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.