मध्यप्रदेश : नवी मुंबईतील सहाय्यक पोलिस आयुक्त अचानक बेपत्ता झाल्याने पोलिस खात्यामध्ये खळबळ पसरली होती. मात्र राहत्या घराच्या परिसरातून बेपत्ता झालेले राजकुमार चाफेकर अखेर सापडले आहेत. 


मध्यप्रदेशात सापडले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहाय्यक पोलिस आयुक्त  चाफेकर सापडले असल्याचे माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.  मध्यप्रदेशातील जबलपूर येथे चाफेकर सापडले आहेत. तेथील स्टेशन मास्तरांनी फोन करून ते स्टेशनवर असल्याचे सांगितले. 


का हरवले चाफेकर ? 


राजकुमार चाफेकर तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. या तणावातच त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. राजकुमार चाफेकर विशेष आर्थिक शाखेचे सहाय्यक आयुक्त आहेत.


कुटुंबीयांनी दाखल केली तक्रार 


6 एप्रिलला रात्री आठ वाजता घरातून निघून गेले आहेत, त्यांनी सोबत मोबाईल फोन देखील नेला नाही, त्यानंतर ते कोणाच्या संपर्कातही नव्हते.  शुक्रवारी 8 च्या सुमारास राजकुमार त्यांच्या सीवुड्स येथील राहत्या घराच्या आवारातून बाहेर पडतानाची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहेत. राजकुमार घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी  संध्याकाळी चाफेकर यांची मिसिंग केस दाखल केली.