Crime News : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) कोपरखैरणे खाडी किनारी असलेल्या एका रस्त्याच्या कडेला 12 फेब्रुवारी रोजी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे (Crime News) अखेर गूढ उकललं आहे. पोलिसांनी (Navi Mumbai Police) 48 तासांत आरोपीला खुनाच्या प्रकरणात अटक केली आहे. लग्नाचा (Marriage) तगादा लावल्याने आरोपी प्रियकराने महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह खाडी किनारी टाकला होता. त्यानंतर महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला (Crime Branch) यश आले आहे. या घटनेतील मृत महिलेची हत्या तिच्यासोबत प्रेमसंबंध असलेल्या सुरक्षारक्षकाने केल्याचे तपासात निषन्न झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार बबुराम पाल (40) असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून मृत महिलेने राजकुमारच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे संपाताच्या भरात राजकुमारने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आणि 48 तासांत आरोपीला अटक केली. महिलेच्या गळ्यावर खुणा आढळल्याने तिला गळा दाबून मारल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले. यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे समोर आले.


तक्रारदार पती मोहम्मद अकिल फकीर मोहमंद हाशमी याच्याकडे मृत महिलेचा फोटो दाखवून चौकशी केली असती ती त्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली. महिलेचा नाव सायदा बानु हासमी असल्याची त्याने दिली. यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मोबाईल मिळवला तांत्रिक तपास करून आरोपी राजकुमारला ताब्यात घेतले.


असा झाला हत्येचा उलघडा


12 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचे प्रेत कौपरखैरणे येथील खाडीलगतल्या झुडपामध्ये आढळले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भादवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा नवी मुंबई येथील गुन्हे शाखा करत होती. महिलेच्या शरीरयष्ठीवरुन ती घरकाम करत होती असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर नवी मुंबई आणि मुंबईतील देवनार, पंतनगर येथील हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींचा आम्ही तपास केला. ट्रॉम्बे येथील एका तक्रारीसोबत या महिलेच्या मृतदेहाचे वर्णन जुळत होते. महिलेच्या पतीने पत्नीच्या मृतदेहाची ओळख पटवली. सायदा बानु हासमी असे या महिलेचे नाव असल्याचे त्यानंतर समोर आले.


"सायदा बानु ही जुईनगर येथे एका सोसायटीमध्ये मोलकरणीचे काम करत होती. आरोपी तिथेच सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मयत महिलेच्या मोबाईवर तीन मोबाईल क्रमांक सापडले ज्यामध्ये सुरक्षारक्षकाच्या क्रमांकवर आम्हाला संशय निर्माण झाला. त्यानंतर आरोपीपर्यंत आम्ही पोहोचलो. राजकुमार पाल असे आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. गेल्या एका महिन्यापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मृत महिलेने माझ्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण माझं आधीच लग्न झालेलं असून मला पत्नी आणि दोन मुले आहेत असे आरोपी राजकुमारने सांगितले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वादाचे रुपांतर हत्येत झाले," अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.