नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक नेहमीप्रमाणेच झाली आहे. त्यामुळे या बाजार समितीत शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवलेला नाही. आज सोमवार असल्यानं बाजारात ६०० गाड्यांची आवक झाली आहे. राज्यातून नाशिक, पुण्यातून या भाज्या आल्ययात. तर कर्नाटक, इंदोर, गुजरात मधूनही भाज्या दाखल झाल्यायत असमुळे भाज्यांचे दर स्थिर आहेत.


मुंबईवरही संपाचा परिणाम नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सर्वात व्यग्र असलेल्या दादरच्या भाजी मंडईत शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवलेला नाही. भाज्यांची आवक व्यवस्थित सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवारच्या तुलनेत काहीसे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा. 


शेतकरी संपात फूट


दरम्यान, शेतकरी संपामध्ये फूट पडल्याचे वृत्त आहे. शेतकरी संपाचा आज चौथा दिवस आहे. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं सरकारला ५ जूनचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिलाय.. सरकारकडून या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. तर सात जून रोजी शहराकडे जाणारे दूध आणि शेतीमाल थांबवण्यात येईल. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर १० जूनला देशभरातील शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिलाय.. मात्र दुसरीकडे प्रस्थापीत नेत्यांनी या संपाला विरोध केलाय..त्यामुळे या संपात फूट पडल्याचं चित्र आहे.