रवी राणा आणि नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट काय आला? पाहा
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीत रवानगी करण्यापूर्वी औपचारिकता म्हणून या दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. (navneet rana and ravi rana tested corona negative)
आता या राणा पती-पत्नीची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. पोलीस रवी राणा यांना थेट तळोजा कारागृहात नेतील. तर नवनीत राणांना भायखळा कारागृहात नेण्यात येणार आहे.
न्यायलयाने या दाम्प्त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याविरोधात 124 अ राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासन आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
दरम्यान जामीन अर्जावर 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याने, आता राणा दाम्पत्याला 29 तारखेपर्यंत तुरूंगात राहावं लागणार आहे.