मुंबई : कोठडीत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला होता. यावर मुंबई पोलिसांनी  VIDEO शेअर करत उत्तर दिलं आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणा यांच्या वकिलांचा दावा
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणांचा खार पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक दावा केला. राणांना खार पोलीस स्टेशनमध्ये नव्हे तर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हीन वागणूक दिल्याची तक्रार केल्याचा मर्चंट यांचा दावा आहे.


त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून सांताक्रूझ पोलीस स्टेशनचा व्हिडिओ रिलीज केला जाणार आहे. सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधील लॉकअपमधील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज तपासलं आहे, पोलिसांनी नवनीत राणा यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार केला, तसंच नवनीत राणा यांना ऑफिसर्ससाठी असलेल्या टॉयलेटचा वापर करु दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या सर्व गोष्टी पोलीस स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालं आहे. त्यामुळे राणा आणि त्यांचे वकील रिझवान मर्चंट खोटा दावा करतायत की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. 


राणा आणि पोलीस संघर्ष चिघळणार
नवनीत राणा आणि मुंबई पोलीस संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणांचा पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ ट्विट केल्यानंतर खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय. नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 


पोलीस ठाण्यात पाणीही न दिल्याचा पोलिसांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा राणांचा प्लॅन होता, तो अयशस्वी झालाय, मुंबई पोलिसांनी आरोपांची पोलखोल केली आहे.