नवनीत राणा यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप
नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : आपण मागासवर्गीय असल्यानेच आपल्याला पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. पोलिसांनी आपल्याला पाणीही दिलं नाही तसंच बाथरूमही वापरू दिला नाही असंही नवनीत राणा यांचं म्हणणं आहे. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हे गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी नवनीत राणा यांच्या सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी पाणी मागितले तर ”खालच्या जातीतील लोकांना आम्ही पाणी पण देत नाही.” अशी भाषा पोलिसांकडून वापरण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केलाय.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरूनच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्याचं पत्रात म्हटलंय. पोलिस आयुक्त, एसीपी आणि डीसीपी वर कारवाई करण्याची मागणी नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.