मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी तो व्हिडिओ ट्विट केल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात पाणीही न दिल्याचा पोलिसांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्लॅन फेल झाला आहे. तक्रार नोंदवनारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख मात्र मध्यरात्री राणा या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात होत्या. 


नवनीत राणा यांच्यावर पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गृह खात्याला रिपोर्ट पाठवल्यानंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी एक व्हिडिओ ट्विट करुन नवनीत राणांना उत्तर दिलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये पाणीसुद्धा प्यायला दिलं नाही, असा आरोप नवनीत राणांनी केला होता. त्याला संजय पांडेंनी ट्विट करुन उत्तर दिलंय. या व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य चहा, पाणी पिताना दिसत आहे. 


आम्हाला अधिक काही बोलायची गरज आहे का, असं संजय पांडेंनी ट्विट करत विचारलंय. दरम्यान हा खार पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ आहे... राणांची तक्रार ही सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधल्या वागणुकीबद्दल होती, असा दावा राणांनी केला. आता थोड्याच वेळात पोलीस सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधला व्हिडिओही रिलीज करणार आहेत.