आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार ठाकरे कुटुंबियांतील `ही` व्यक्ती
ठाकरे कुटुंबियातील (Thackeray family) एक व्यक्ती शिंदेंच्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे अशी, माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे.
CM Eknath Shinde : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरु असतानाच शिंदे (Shinde) आणि ठाकरे गटात (Thackeray group) सतत घडामोडी सुरु असतात. त्यात दसरा मेळाव्याचा (Dussehra gathering) वादावर अखेर तोडगा निघाला आहे. त्यातच आताची शिवसेना आणि शिंदे गटासाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियातील (Thackeray family) एक व्यक्ती शिंदेच्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे अशी, माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे.
ठाकरे कुटुंबियांतील 'ही' व्यक्ती जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या देवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बायको रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) जाणार, असल्याचं बोलं जातं आहे. ठाण्यातील (Thane) जय अंबे नवरात्रोत्सवाला (Jai Ambe Navratri festival) रश्मी ठाकरे उद्या भेट देणार आहे. एकनाथ शिंदे यांची मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका (Thane Tembhi Naka) जय आंबे देवीची ओळख आहे. स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी टेंभी नाका जय आंबे देवीची स्थापना केली होती...(Navratri 2022 shivsena Rashmi Thackeray said to be visiting cm Eknath Shinde devi pandal nm)
दसरा मेळाव्याचा तोडगा सुटला!
तरदुसरीकडे दसरा मेळाव्याला अखेर मुंबई महानगरपालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केलीय. तरीदेखील ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटाने कंबर बांधली आहे. शिंदे गटाची आज वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) दुपारी चार वाजता दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक होतेय. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत (Mumbai) आणण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरु झाली आहे.
शिंदे-फडणवीसला मोठा धक्का
महाराष्ट्रातील राजकारण ठाकरे आणि शिंदे गटामुळे ढवळून निघाली आहे. तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे शिंदे-फडणवीसला (Shinde-Fadnavis) मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत (12 MLAs) कोणतेही पाऊल उचलू नका, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे दिले आहेत.
शिंदे गटात एन्ट्री!
शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक (Hemangi Vamanrao Mahadik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सावली म्हणून ओळखले जाणारे थापा म्हणजे चंपासिंह थापा (champa singh thapa) यांनी देखील एकनाश शिंदे यांच्या गटात (Eknath Shinde group) प्रवेश केला होता.