मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत यामधून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांचं खंडन केलं. नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या भूखंडांच्या व्यवहारांचा तपशील सर्वांसमोर आणत फडणवीस यांनी हा 'बॉम्ब' माध्यमांसमोर फोडला. ज्यानंतर मलिकांच्या दिशेनं अनेकांनी प्रश्नार्खत सूर आळवला. ही सर्व परिस्थिती पाहता अखेर फडणवीसांमागोमाग लगेचच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत काही बाबतीत खुलासे केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर प्रकरणी बुधवारी सकाळी 10 वाजता आपण सविस्तर माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय अंडरवर्ल्डशी नेमका कोणाचा संबंध आहे हेसुद्धा आपण सांगणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कुर्ल्यामध्ये आमची जमीन आहे. सलीम पटेल यांच्याकडून आम्ही ती जमीन घेतली. शिवाय अंडरवर्ल्डच्या दबावात कोणताही व्यवहार झाला नसल्याचं त्यांनी अधोरेखित करत सांगितलं. 


सदर जमीन प्रकरणी आपल्याकडे सर्व कागदपत्र आहेत, ज्याची स्टॅम्पड्युटीही भरली आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप त्यांनी परतवून लावले. 


देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत केला असं म्हणत बॉम्बस्फोटाच्या आरोपीसोबत कोणताही व्यवहार केला नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. शिवाय आपण, कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असं त्यांनी सांगितलं. खोटं बोलायचं असेल तर नीट बोला असा इशारा देवेंद्र फडणवीस यांना देत आपल्यावर 62 वर्षांत अंडरवर्ल्डसंदर्भात आरोप करण्य़ात आलेले नाहीत ही बाब नमूद केली.