मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrested)  यांच्या अटकेनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. अटकेच्या दिवशी नेमकं काय घडलं. याचा आखो देखा हाल नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक (Nawab Malik Daughter Nilofar)  यांनी पत्रकार परिषदेत सांगितलाय. (nawab malik daughter nilofar malik telling about what happend during to ed inquiry and arrest to minority minister in money laundering case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी ईडीनं मनी लाँड्रीग प्रकरणी नवाब मलिक यांची तब्बल 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप त्यांची मुलगी निलोफर मलिक यांनी केलाय. 


अटकेच्या दिवशी नेमकं काय घडलं ? याचाच पाढा निलोफर यांनी पत्रकार परिषदेत वाचला. नवाब मलिकांच्या अटकेनं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. 


चौकशी अपेक्षितच होती मात्र ईडीनं नियमाला धरून समन्स बजावला नाही असा आरोप निलोफर यांनी केलाय.


निलोफरनं नवाब मलिकांवरील कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले असले तरी मलिक यांना या प्रकरणात मोठी किंमत मोजावी लागणार की केवळ ईडीच्या कोठडीवरच निभावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.