मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NAWAB MALIK ) यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर ( HASINA PARKAR ) आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावली. त्यामुळे त्यांच्याविरोधात मनी लाँण्ड्रींगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल असं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष न्यायाधीश राहूल एन रोकडे यांनी आपल्या निरीक्षणात डी कंपनीचे सदस्य हसिना पारकर ( HASINA PARKAR ) , सलीम पटेल ( SALIM PATEL ) आणि सरदार खान ( SARDAR KHAN ) यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचला. मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती नवाब मलिक यांनी बळकावली. मलिक यांचा थेट सहभाग आर्थिक गैरव्यवहारामध्ये होता असं न्यायालयाने म्हटले आहे.


मलिक यांना प्रत्यक्षात सर्व माहिती असताना त्यांनी गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला हे पुराव्यांवरुन स्पष्ट होतंय असं सांगतानाच या प्रकरणामध्ये १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार सहावली खान यांच्याविरोधातही कारवाई करण्याची परवानगी दिली आहे.


ईडीने आपल्या आरोपपत्रात 'मलिक यांनी एका सर्वेक्षकाच्या माध्यमातून गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर भाडेकरूंचा सर्व्हे केला. त्या सर्व्हेअरशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी सरदार शाहवली खानची मदत घेतली असं म्हटले आहे.