मुंबई : Nawab Malik money laundering case : राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी (ED)  कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केले गेले. यावेळी युक्तीवाद करताना नवी माहिती समोर आली आहे. 55 लाख हसीना पारकर हिला दिल्याचा दावा ईडीने केला. टेरर फँडिंगचा आरोप केला आता मात्र ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे, आज रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत. या चुकीमुळे मलिक यांनी ईडी कोठडीत काढले आहेत. ईडीने नीट गृहपाठ करावा, असे नवाब मलिक यांच्या वकीलांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नवाब मलिक यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स बजावला आहे. त्याने काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, ईडीने मुदत दिलेली नाही. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.  आज कोर्टात ईडी आणि नवाब मलिकांच्या वकिलांत युक्तीवाद सुरु झाला आहे. त्यावर कोर्ट पुन्हा ईडी कोठडी देते की न्यायालयीन कोठडीत पाठवते याची उत्सुकता आहे. मात्र, सुनावणीच्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली.


55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा ईडीने केला. याबाबत ईडीन टेरर फँडिंगचा आरोप केला, आता मात्र ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे. आज रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत, या चुकीमुळे मलिक यांनी ईडी कोठडीत काढले आहेत, ईडीने नीट गृहपाठ करावा, नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद करताना म्हटले आहे.


 उद्या कोणीही वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे उठेल आणि नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगेल.  ब्लास्टमध्ये दोषी असलेल्या लोकांचे जवाब घेऊन त्यांना या केसमध्ये साक्षीदार म्हणून बनवलं जात आहे. पण त्यांच्या साक्षीची विश्वासार्हता किती हा प्रश्न आहे, असा सवाल नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. लास्ट अप्लिकेशनमध्ये मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉनशी संपर्क दाखवला आहे. चौकशीबाबत गुप्त ठेवण गरज आहे. मात्र आज पेपरमध्ये या प्रकरणाबाबत बातमी आली आहे. ईडीचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. आता मलिक यांचे वकील युक्तीवाद करत आहेत. 


मलिक एक कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून ते पुराव्याशी छेडछाड करतील असे ईडी सांगत आहे. मात्र या प्रकरणातील माहिती कोर्टच्या आधी मीडियात येत आहे. तपास यंत्रणा आम्ही काही माहिती मागितली की आम्हाला गोपनीयतेचे नियम सांगतात. 


आजच प्रसार माध्यमातून आणि काही वृत्त पत्रातून केलेल्या तपासाची माहिती लीक केली गेली. नवाब मलिक हे मंत्री आहे म्हणून पुरावे छेडछाड करू शकतात असे सांगितले गेले, पण प्रसार माध्यमातून माहिती कशी काय लीक झाली, असा सवाल सुनावणीच्यावेळी नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई उपस्थित केला.


कृपया मलिक यांना बाहेर सोडा. ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत, मात्र चौकशीबाबतची माहिती गुप्त ठेवा. 25 वर्षांनंतर कोणी उठते शत्रुत्व काढण्यासाठी आरोप करते. या प्रकरणात अंडरवर्ल्डशी निगडित लोकांच्या विधानावर ईडीचा विश्वास बसतो. प्रामाणिकपणे चौकशी करा, या केसमध्ये अचानक गुन्हेगारी जगतातील 25 वर्षांनी व्यक्ती विश्वासार्ह बनली आहेत, असा आरोप नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी केला.