देवेंद्र फडणवीसांनी फटाके फोडण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघू नये - नवाब मलिक
नवाब मलिकांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबई : गेल्या २६ दिवसात दोन महिलांची फक्त नाव घेतली कारण त्या विषयाशी संबंधित होत्या. पण महिला मुद्द्याला घेऊन काही लोक मला प्रश्न विचारत आहेत. पण किरीट सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेतात,संजय राऊत यांच्या पत्नीचे नाव घेतात,खडसे यांच्या पत्नीचा उल्लेख करतात मग या महिला नाहीत का? की यांच्या महिला फक्त महिला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी सोमवारी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावेळी फडणवीस म्हणाले की,'दिवाळी आधी लवंगी फोडू मोठा आवाज करण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी त्यांनी माझ्याशी बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना इशारा दिला आहे.'
फडणवीसांनी जावयावर लावलेल्या आरोपावर मलिकांची प्रतिक्रिया
नवाब मलिक प्रतिक्रिया देताना म्हणाले,' माझ्या जावायाकडे गांजा सापडला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप लावले. "किसीं माय के लाल मे हिम्मत नही है मेरे तरफ उंगली उठाने के की मेरे अंडरवर्ल्ड से संबंध है', असा खणखणीत प्रत्युत्तर नवाब मलिकांनी दिलं आहे. यावरच ते थांबले नाही पुढे ते म्हणाले की,'देवेंद्र फडणवीस यांनी फटाके फोडण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट बघू नये'. तसेच 'तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री होतात, मग कारवाई का केली नाही ?, असा सवालही त्यांनी विचारला.
मी जे सत्य समोर आणत आहे. हॉटेल फॉर सिझन मध्ये पार्टी व्हायच्या एका टेबल ची किंमत 15 लाख होती. 15 करोड रुपयांची पार्टी व्हायची. सरकार बदलल्यावर पार्टी बंद झाल्या. अश्या पार्टी होतात मग फडणवीस का गप्प होते ?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.