नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी, सुटकेचा मार्ग मोकळा?
Nawab Malik Case : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली आहे.
मुंबई : Nawab Malik Case : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ते आता जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Nawab Malik to be remanded in judicial custody)
मनीलॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपणार होती. मात्र, ईडीने पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) मनी लाँड्रिंग (Money Laundring) प्रकरणात अटक केली आहे. त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली होती. त्यानंतर सात मार्चपर्यंत पीएमएलए ईडी कोठडीत वाढ केली होती.
ईडी कोठडीत असताना मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 28 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. ईडीच्या कोठडीत असताना काय झालं याची माहिती ईडीने कोर्टाला दिली.
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तीवाद
55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा करण्यात आला, टेरर फंडिंगचा आरोप केला, आता मात्र ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे, रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत, ईडीच्या चुकीमुळे मलिक यांना ईडी कोठडीत इतके दिवस काढावा लागले, ईडीने नीट गृहपाठ करावा असा युक्तिवाद नवाब मलिक यांचे वकिल अॅड अमित देसाई यांनी केला.
चौकशीबाबत गुप्त ठेवण गरज आहे. मात्र आज पेपरमध्ये या प्रकरणाबाबत बातमी आली आहे, मलिक एक कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून ते पुराव्याशी छेडछाड करतील असं ईडी सांगत आहे, मात्र या प्रकरणातील माहिती कोर्टाच्या आधी मीडियात येत आहे, तपास यंत्रणा आम्ही काही माहिती मागितली की आम्हाला गोपनीयतेचे नियम सांगतात, आजच प्रसार माध्यमातून आणि काही वृत्त पत्रातून केलेल्या तपासाची माहिती लीक केली गेली असं अॅड अमित देसाई यांनी म्हटलं.
कृपया मलिक यांना बाहेर सोडा, ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत, मात्र चौकशीबाबतची माहिती गुप्त ठेवा अशी विनंती अॅड. अमित देसाई यांनी केली. 25 वर्षांनंतर कोणी उठतं शत्रुत्व काढण्यासाठी आरोप करतं, या प्रकरणात अंडरवर्ल्डशी निगडित लोकांच्या विधानावर ईडीचा विश्वास बसतो, या केसमध्ये अचानक गुन्हेगारी जगतातील 25 वर्षांनी व्यक्ती विश्वासार्ह बनली आहे, असं मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला.