मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर अध्यक्षांचा माईक ओढण्यात आला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक अध्यक्षांच्या दलानातील राड्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजप आमदारांनी दालनात राडा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. 



नवाब मलिकांचा भाजपाला इशारा


ज्या प्रकारे सभागृहात सगळं घडलं, विरोधी पक्षनेत्यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला’, त्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी घटना घडलीय ती अतिशय निंदनीय आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला, शिवीगाळ केली जाते, हे चालू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे.