मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही तिथे होते असा आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे दुबईतील फोटो ट्विट केले आहेत. 


ते फोटो मुंबईतले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. गेल्या पंधरा दिवसांपासून माझ्या मृत आईवर, माझ्या निवृत्त वडिलांवर आणि माझ्या बहिणीवर आरोप केले जात आहेत. घाण शब्द वापरले जात आहेत, मी याचं खंडण करतो, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक मोठे मंत्री आहेत, त्यांना लोकांचा अपमान करण्याचे अधिकार असतील, मी एक लहान सरकारी अधिकारी आहे, मी माझं काम करतोय आणि देशाची सेवा करण्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तर मी त्याचं स्वागत करतो, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. 


नवाब मलिक यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईतले आहेत, हवं तर माझा पासपोर्ट डेटा चेक करा, विमानतळाकडून तुम्ही माहिती घेऊ शकतात असं आवाहन वानखेडे यांनी केलं आहे. मलिकांनी ट्विट केलेले फोटो हे मुंबईतले असल्याचा दावा वानखेडेंनी केलाय.



कायदेशीर उत्तर देणार


यावर उत्तर देताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि जस्मिन वानखेडे यांचे दोन फोटो ट्विट केले आहेत. समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे हे 10 डिसेंबर 2020 ला दुबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये गेले होते, त्यामुळे समीर वानखेडे खोटं बोलत आहेत, असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


तर समीर वानखेडे यांच्या बहिणीनेच हे फोटो दुबईचे असल्याचं सांगत इन्साग्रामवर अपलोड केलेले आहेत. त्यामुळे आपणही त्यांना कायदेशीरच उत्तर देणार असल्याचं प्रतिआव्हान मलिक यांनी दिलं आहे. जास्मिन वानखेडे यांच्या इन्स्टाग्रामवर जे फोटो आहेत दुबईचे असं म्हटलं आहे, आणि भाऊ सांगतोय ते फोटो दुबईचे नाहीत. सत्य समोर येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.