मुंबई : Nawab Malik case : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. आज न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. (Nawab Malik's judicial custody) दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांच्या वकिलांनी काही मागण्या केल्या. यावेळी बेड मिळावा यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज केला आहे. तसेच मलिक यांनी न्यायालयात मेडिकल रिपोर्ट सादर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिक यांच्या काही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. मलिक यांना बेड, गादी आणि खुर्ची मिळणार आहेत. सत्र न्यायालयाने मलिक यांच्या मागणीच्या या तीन गोष्टी मंजूर केल्या केल्या आहेत. तसेच हायपर टेन्शन आणि डायबेटीस असल्याने कमी मिठाचे जेवण मिळावे यासाठी घरचे जेवण मिळावे, अशी विनंती मलिक यांच्याकडून वकिलांनी केली, यावर मेडिकल रिपोर्ट पाहून न्यायालय नंतर निर्णय देणार आहे.


डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा देण्यास  न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने इडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.