मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे दीड तास नवाजुद्दीन सिद्धिकी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते.


बहुचर्चित ठाकरे चित्रपटाच्या निमित्तानं ही भेट झाली. संजय राऊत निर्मित 'ठाकरे' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धिकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहेत. 


गेल्या डिसेंबरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ठाकरे चित्रपटाच्या टिझरला सोशल साईट्सवर विक्रमी प्रतिसाद मिळाला होता.


चित्रपटाच्या चित्रीरकरणाला मार्चमध्ये सुरुवात होईल.